लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याकडे असलेली संपत्ती ही त्याची नसून माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची असल्याचा दावा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जरांगे पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांना आमदारकीपासूनही हटवले पाहिजे. मुंडे मंत्री असताना कराड हाच त्यांची संपूर्ण कामे पाहत होता.