शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:25 IST

मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पुण्यात १० तास सुरू होती. पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारीच्या हालचाली वाढल्या आहेत. मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. तसेच, गेल्या तासाभरापासून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. 

आज मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे लोणावळ्यात दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे. तसेच, राज्य सरकारच्यावतीने आरक्षणाच्या मागणीवर चर्चा होणार आहे. याबाबत मधुकर राजे अर्दड एका वृत्त वाहिनीला माहिती दिली. ते म्हणाले, शासनाचे आदेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. तसेच, आजची चर्चा  सकारात्मक होईल आणि मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होईल, असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, बुधवारी मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा पुण्यात १० तास सुरू होती. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही यात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. दरम्यान, लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

नवी मुंबईत मार्ग बदललानवी मुंबईत येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा मार्ग बदलला आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे. सायन - पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळस्पे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवे मार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे. मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्याने पनवेल , कामोठे , कंळंबोली , खारघर मधील वाहतूक कोंडी न होता  मुंबई - पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत चालणार आहे. आज हा मोर्चा पनवेलमध्ये मुक्कामी असणार आहे. तसेच या कार्यकर्त्यांसाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी आणि चपात्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाlonavalaलोणावळा