शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

आंब्याचा गोडवा अमेरिकेत!

By admin | Updated: June 26, 2016 04:49 IST

वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून केशर, तोतापुरी या जातीचा एकूण १३ टन आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. भारतीय आंबा निर्यातीच्या दृष्टिकोनातून

पुणे : वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून केशर, तोतापुरी या जातीचा एकूण १३ टन आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. भारतीय आंबा निर्यातीच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला समुद्रामार्गे निर्यातीची ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असून, यामुळे भारतीय आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकणार आहे. राज्यात उत्पादित होणारा हापूस व केशर आंब्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या २० वर्षांपासून भारतीय आंब्याला अमेरिकन बाजारपेठेमध्ये बंदी होती. सन २००६ मध्ये अमेरिकेने भारतीय आंब्याकरिता अमेरिकन बाजारपेठ काही अटी व शर्तींवर खुली केली. त्यामध्ये आंब्यावर निर्यातीपूर्वी विकिरण प्रक्रिया करण्याबाबत सूचित केले. कृषी पणन मंडळाने सुरवातीला लासलगाव येथील कृषक या विकीरण सुविधेचा वापर करून आंबा निर्यात निर्यातदारामार्फत सुरू केली होती. २०१६ पासून वाशी येथील विकीरण सुविधा केंद्रावरून मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात सुरू करण्यात आली. या हंगामात आतापर्यंत १७५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून निर्यातदारांनी विमानमार्गे निर्यात केला आहे. शुक्रवारी १३ टन आंब्याचा कंटेनर समुद्रामागे अमेरिकेला रवाना झाला. या वेळी अमेरिकन निरीक्षक प्रेम बालकरण, अपेडा मुंबईचे पी. पी. वाघमारे, सी. बी. सिंग, कृषी पणन मंडळाचे ओ. पी. नीला, डॉ. भास्कर पाटील, डी. एम. साबळे, सतीश वराडे, अभिमन्यू माने, सुशील चव्हाण आदी उपस्थित होते. आंब्याचा कंटेनर १९ दिवसांत न्यूयॉर्क येथील बंदरात पोहोचून तेथे विक्रीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मेक्सिको, फिलिपाईन्स, ब्राझील, हैती या देशांच्या आंब्याच्या तुलनात्मक दरात भारतीय आंबा ग्राहकास मिळणार असल्याने अमेरिकन बाजारपेठ मोठ्या प्रमाणात काबीज करता येऊ शकेल.