शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णावर उपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:14 IST

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात संध्या गणेश सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मांत्रिकास बोलावून त्यांच्यावर उतारा केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहेश विष्णू जगताप (वय २२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली डॉ. सतीश चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर गुन्हा दाखल आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णावर उतारा करणाऱ्या मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अजूनही फरार आहे. सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, रा. ३०६, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंद्धश्रद्धेला चालना दिल्या प्रकरणी डॉ. चव्हाण याच्यावरही गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २० फेब्रुवारी ते ११ मार्च २०१८ या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्या होत्या. त्या काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. सतीश चव्हाण याच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात येते होते. हे आॅपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यापूर्वी संध्या या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी ७ ते साडेआठ ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रिया करण्यापासून परावृत्त करण्यात आले. बरे होण्यासाठी संध्या यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्यावर उतारा केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. सतीश चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याचा व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये येरवडेकर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण याच्या शोधासाठी आणि येरवडेकर मांत्रिक आहे. त्याने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलCrimeगुन्हाPoliceपोलिस