शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

यंदापासून मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार

By admin | Updated: February 22, 2016 01:03 IST

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न होणार आहे.

मुंबई : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न होणार आहे. या वेळी पहिल्यांदाच मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार आणि डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, अन्य पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ८ ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. त्यात ‘मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास’, राणा चव्हाण यांच्या लेखांचा संग्रह, खाद्यसंस्कृती कोश, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मपर वाङ्मय दुसरा खंड (एकूण चार पुस्तके) आणि संत साहित्याचे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर यांच्यावर आधारित ग्रंथ यांचा समावेश आहे.या सोहळ्यात श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार २०१५, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०१५ आणि उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१४ वितरण सोहळाही पार पडणार आहे. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार (२०१५) प्राप्त साहित्यिकांनाही गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मराठी भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा ‘मराठीनामा’ हा कलाकारांचा दृकश्राव्य कार्यक्रम सादर होणार आहे. (प्रतिनिधी)