शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून होतेय मांडूळ सापाची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 16:17 IST

तस्करीचे कनेक्शन मेळघाट ते नागपूर : अचलपूर ते आसेगाव दरम्यान सात दलालांना अटक

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मध्यप्रदेशातून-महाराष्ट्रात होत असलेल्या मांडूळ सापाच्या तस्करीबाबतचे मेळघाट ते नागपूर कनेक्शन पूर्व मेळघाट वनविभागाच्या हाती लागले आहे. यात अचलपूर ते आसेगाव दरम्यान सात दलालांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यातील एक नागपूर जिल्ह्यातील, तर दुसरा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. उर्वरित अमरावती जिल्ह्यातील आहेत.

मांडूळ सापाबाबतची यू ट्यूबवरील माहिती आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किंमत बघून हे सातही लोक मांडूळ सापाच्या तस्करीत दलाल म्हणून अडकले आहेत. साडेतीन ते चार किलो वजनाच्या या सापाच्या तस्करीत यांना लाखो रूपये दलालीपोटी मिळणार होते. यातील तिघांना त्यांच्या स्कुटीसह आसेगाव लगतच्या पेट्रोलपंपवरून, तर चौघांना त्यांच्या कारसह आसेगाव बसस्टँडवरून वनविभागाने ताब्यात घेतले. यांना शुक्रवारी अचलपूर न्यायालयापुढे उभे करून त्यांची मंगळवारपर्यंत वनकोठडी वनविभागाने मिळविली.

११ डिसेंबरला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्राधिकारी यांनी स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच ०४ बीके ४७५१ मधून मांडूळ सापासह शेख इम्रान शेख इकबाल (३१, रा. गौलखेडा बाजार, ता. चिखलदरा) आणि तनवीर खान शरीफ खान (३८, रा. धारणी) यांना अटक केली. १४ डिसेंबरपर्यंत वनकोठडी घेतली. स्कॉर्पिओ जप्त केली आणि प्रकरण पूर्व मेळघाट वनविभागाकडे हस्तांतरित केले. मध्यप्रदेशातील बºहाणपूर येथून मांडूळ सापासह निघालेली ही स्कॉर्पिओ गाडी ११ डिसेंबरला चिखलदरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ थांबली. तेथून ती परतवाड्याकडे येत असताना ब्रम्हासती नाल्यावर आमझरी वर्तुळात वनाधिकाºयांनी पकडली होती.

पूर्व मेळघाट वनविभागाने दोन्ही आरोपींना अचलपूर न्यायालयापुढे १४ डिसेंबरला उभे करून वनकोठडी वाढवून घेतली. यातील शेख इम्रान शेख इकबाल याला १७ डिसेंबरपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या चौकशीत शेख इम्रान शेख इकबाल यालाच पुढे करून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्या सात दलालांना अटक केली आहे. साडेतीन ते चार किलो वजनाच्या मांडूळ सापाचे हे दलाल आरोपी शेख इम्रान यास तीन लाख रुपये देणार होते आणि नागपूर येथील तस्कराला पुरविणार होते.

प्राप्त माहितीनुसार, मांडूळ सापाच्या तस्करीत तीन ते चार किलोच्या सापालाच अधिक महत्त्व आहे. यापेक्षा कमी वजनाच्या सापाला कुणीही विकत घेत नाही. तस्करी करीत नाही. हा एक बिनविषारी साप आहे. यालाच दुतोंड्या साप म्हणतात. हा साप पहिले सहा महिने एका तोंडाने खातो आणि दुसºया तोंडाकडून चालतो. नंतरच्या सहा महिन्यात दुसºया तोंडाने खातो आणि पहिल्या तोंडाकडून चालतो. एकाच वेळेत दोन्ही तोंडाचा तो वापर करू शकत नाही.

काय आहेत अंधश्रद्धा?इंडोनेशिया, युरोप आणि चायनामध्ये या सापाला अधिक महत्त्व आहे. परंपरागत शक्तीवर्धक आणि कामवासना उत्तेजित करणाऱ्या औषधांमध्ये त्याचा वापर होतो. देशपातळीवर या सापाची किंमत ५ ते १० लाख असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर याची किंमत तीन ते पंचवीस कोटी आहे. या सापाविषयी अनेक अंधश्रद्धा जोपासल्या गेल्या आहेत. हा साप धनशक्तीची देवता असून त्याचे सुबेरासोबत नाते आहे. याच्या दर्शनाने धनशक्तीत वाढ होते, असा गैरसमज असून, तंत्र-मंत्र विद्येतही याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश