शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सहावी पर्यंतच्या वर्गासाठी महिला शिक्षक आणि कर्मचारी नेमा"; बदलापूर घटनेनंतर शिक्षण विभागाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:18 IST

शाळेतील शिक्षकांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

Badlapur School Crime : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर शिक्षण विभागाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळेमध्ये नव्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरती होणाऱ्यांसाठी आता पोलिसांच्या दाखल्याची सक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश शिक्षण विभागाकडून पारित करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनी कामावर रुजू होताना त्यांच्या चारित्र्याचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याचा दाखला पोलिसांकडून आणणं बंधनकारक असणार आहे. बदलापूर अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासोबत सहावी पर्यंतच्या वर्गात शिक्षक आणि कर्मचारी शक्यतो महिला नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर राज्यभरातील अनेक शाळांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. शिक्षण विभागाकडून आता राज्यातील शिक्षकांना पोलीस व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात दाखला घेण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरु झाली आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनींसोबत अनेक घृणास्पद प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याच्या घटना समोर आल्याने पालकांकडूनही चिंता व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून राज्याच्या शिक्षण विभागासोबत शाळा व्यवस्थापनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आलं आहे. शिक्षकावर आतापर्यंत कोणता गुन्हा दाखल आहे का, त्याची वर्तणूक कशी आहे याची माहिती असलेला पोलिसांचा दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे महिला शिक्षकांनाही अशा प्रकारचा दाखला द्यावा लागणार आहे.

काय म्हटलंय आदेशात?

- नव्याने भरती झालेल्या शिक्षकाला पोलिसांचे व्हेरिफिकेशन बंधनकारक- शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही पोलिसांचे व्हेरिफिकेशन बंधनकारक- शाळेतील चालकांनाही चारित्र्य प्रमाणपण सादर करणे अनिवार्य- सर्व सरकारी आणि खासगी शाळांना हे नियम लागू असणार- सहाव्या वर्गापर्यंत शक्यतो शिक्षक आणि कर्मचारी महिलाच नेमाव्यात- सर्व शाळांनी महिनाभरात सीसीटीव्ही बसवावेत, ठराविक वेळेत तपासावेत- सीसीटीव्हीची तपासणी ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी- शाळेत तक्रार पेटी लावावी आणि तक्रार असेल तर तात्काळ कारवाई करावी 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbadlapurबदलापूरPoliceपोलिसDeepak Kesarkarदीपक केसरकर