मंदाकिनी खांडेकर यांचे निधन
By Admin | Updated: November 24, 2014 02:54 IST2014-11-24T02:54:44+5:302014-11-24T02:54:44+5:30
प्रसिद्ध साहित्यिक भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर यांच्या कन्या प्रा. मंदाकिनी खांडेकर (७७) यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले.

मंदाकिनी खांडेकर यांचे निधन
कोल्हापूर : प्रसिद्ध साहित्यिक भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर यांच्या कन्या प्रा. मंदाकिनी खांडेकर (७७) यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. त्या प्रदीर्घ काळ आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
प्रा. खांडेकर यांनी एम.ए.एम.एड्. केल्यानंतर प्राध्यापिका म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. न्यू कॉलेज, आंतरभारती, महावीर कॉलेजमध्ये मराठी व शिक्षणशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून सेवा केली. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ‘विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका’ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याकडेही साहित्यदृष्टी होती. वडील वि. स. खांडेकर यांच्या ‘अस्थी’, ‘यज्ञकुंड’, ‘घरटं’ आदी पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. ‘अमृतवेल’ पुस्तकावर त्यांनी टीव्ही सिरीयलही केली होती. त्यांच्या मागे दोन बहिणी, एक भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.