मंचरला हमालाच्या खुनाचा गुन्हा १९ तासांत उलगडला

By Admin | Updated: March 7, 2017 01:22 IST2017-03-07T01:22:11+5:302017-03-07T01:22:11+5:30

शनिवारी (दि.४) रात्री १० वाजता ३६ वर्षीय हमाल गणेश बबन निघोट यांच्या खुनाचे रहस्य मंचर पोलिसांना अवघ्या १९ तासांत उलगडले.

Manchar blamed the killings of Hamas in 19 hours | मंचरला हमालाच्या खुनाचा गुन्हा १९ तासांत उलगडला

मंचरला हमालाच्या खुनाचा गुन्हा १९ तासांत उलगडला


मंचर : मंचर बस स्थानकानजीक शनिवारी (दि.४) रात्री १० वाजता ३६ वर्षीय हमाल गणेश बबन निघोट यांच्या खुनाचे रहस्य मंचर पोलिसांना अवघ्या १९ तासांत उलगडले. गणेश निघोट याने शिवी दिली म्हणून राग अनावर होऊन तीन तरुण आणि दोन अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून निघोट याचा खून केला. याप्रकरणी तीन तरुणांना मंचर पोलिसांनी अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना पुणे येथील बाल सुधारगृहात रवाना केले आहे.
आेंकार अण्णासाहेब बाणखेले (वय २१, रा. मंचर), आदित्य बबन नवले (वय २०, रा. मंचर), पवन सुधीर थोरात (वय १८, रा. मंचर) आणि अल्पवयीन मुले १३ वर्षे ९ महिन्यांचा (रा. मंचर) आणि १५ वर्षे १० महिने, रा. पिंपळगाव खडकी अशा पाच आरोपींवर मंचर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मोटारसायकलवरून मंचर बसस्थानकाच्या पाठीमागे निर्जनस्थळावरून जात असताना त्यांना चिंचेच्या झाडाखाली एक व्यक्ती दारू पिऊन झोपल्याचे दिसून आले. जेवण करायचे परंतु पैसे नाही, असे म्हणून त्यांनी दारू प्यायलेल्या इसमाच्या शर्ट आणि पॅन्टचे खिसे तपासले. त्यावेळी दारू प्यायलेला इसम जागा होऊन त्याने शिव्या दिल्या. तसेच, तो उठून बसू लागत असता आदित्य नवले, पवन थोरात यांनी त्या इसमाच्या पाठीवर लाथ मारली. तसेच ओंकार बाणखेले आणि इतर दोघां अल्पवयीन साथीदारांनी दारू प्यायलेल्या इसमाच्या पोटात लाथा मारल्या. त्या वेळी आदित्य नवले म्हणाला की, या बेवड्याला खपवा,असे म्हटल्यावर एका अल्पवयीन आरोपीने बाजूला पडलेला सिमेंटचा ठोकळा इसमाच्या डोक्यात टाकला. त्यावेळी आदित्य नवले यांने, अरे तो जिवंत आहे अजून एकदा दगड टाक, असे म्हणताच पुन्हा त्या अल्पवयीन मुलाने तोच दगड उचलुन त्या इसमाच्या डोक्यात टाकला. पवन थोरात याने पुन्हा दगड उचलून त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकला आणि त्यानंतर आम्ही मोटार सायकलवरून घरी गेल्याची कबुली आरोपींनी दिली. यातील तीन आरोपी ओकार बाणखेले,आदित्य नवले आणि पवन थोरात यांना गुरुवार, दि. ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तर इतर दोन अल्पवयीन मुलांना पुणे येथील बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Manchar blamed the killings of Hamas in 19 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.