शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 06:35 IST

Prithviraj Chavan Criticize Devendra Fadnavis: दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक  क्रूर विनोद असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दावोसच्या दौऱ्यादरम्यान देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी लाखो कोटींचे करार केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या करारांमध्ये भारतातीलही बहुतांश कंपन्यांचा समावेश होता. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक  क्रूर विनोद असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. 

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे करार झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

या पोस्टमध्ये चव्हाण पुढे लिहितात की,  मागील दाव्होस दौऱ्यातील करारांपैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक आणि त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी महाराष्ट्रातीलच कंपन्यांसोबत दावोसमध्ये झालेल्या करारांवरही त्यांनी टीका केली. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दावोसमध्ये करार करण्याबद्दल कर्नाटक सरकारमधील उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी करार करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अदाणी आणि लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक  क्रूर विनोद आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

तसेच आत्तापर्यंत दावोसमध्ये घोषणा केलेल्या करारांवर आणि त्यांच्या कार्यकाळात  महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा सवालही चव्हाण यांनी या पोस्टच्या माध्यमातून विचारला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chavan Criticizes Davos Deals with Local Firms as a Cruel Joke.

Web Summary : Prithviraj Chavan criticized the Maharashtra government's Davos deals with local companies like Adani and Lodha, calling it a cruel joke. He questioned the actual investment and job creation from previous Davos trips, emphasizing the need for transparency and real employment opportunities for Maharashtra's youth.
टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र