शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

"अमोल मिटकरी यांच्यावरील हल्लाप्रकरणी राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा’’ अजित पवार गटाची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:24 IST

Amol Mitkari Attack case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच तापले आहे. तसेच या प्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच तापले आहे. तसेच या प्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केली आहे.  पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की,  हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांची गाडी फोडली. सर्वसामान्य नागरिकांवर असा प्रसंग यायला नको, परंतु विधिमंडळाच्या सदस्याच्याबाबतीत असा प्रसंग येत असेल तर ही चिंतनीय बाब आहे. या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे. या हल्ल्यातील आरोपी जय मालोकर या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूला राज ठाकरे जबाबदार आहेत असा आरोपही उमेश पाटील यांनी यावेळी केला.राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 'राडा संस्कृती' निर्माण केली आहे त्यामुळे तरुणपिढी बेरोजगारीकडे जास्त झुकली आहे. या सर्व प्रकाराला आणि तरुणांची बेरोजगार फौज तयार करण्याला राज ठाकरे जबाबदार आहेत, असा दावाही उमेश पाटील यांनी केला. 

राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने संतप्त मनसे सैनिकाने आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मात्र त्यानंतर त्या तरुणाचा जीव गेला. आपल्या एका कार्यकर्त्यांला जीव गमवावा लागला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांना अक्कल येत नाही, उलट आमदार अमोल मिटकरी यांना कुत्र्यासारखं मारण्याची भाषा करत आहेत. राज ठाकरे यांच्या घरात कुत्रा होता त्याला ते मारत असल्याने त्या कुत्र्याने घरातील व्यक्तीचा चावा घेतला. असा दावा   करतानाच महाराष्ट्रात जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्याही तुमच्या कार्यकर्त्याची नाही, अशी बोचरी टीका उमेश पाटील यांनी केली. 

एका कार्यकर्त्यांला हल्ला करायला प्रवृत्त करणे आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू होणे हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. कायदा हा सर्वांना सारखा आहे त्यामुळे राज ठाकरे यांना कायदा वेगळा नाही त्यामुळे तसा गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेश पाटील यांनी केली. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस