'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
By राजेश निस्ताने | Updated: November 9, 2025 06:26 IST2025-11-09T06:25:56+5:302025-11-09T06:26:34+5:30
Vande Bharat Railway Coach: वंदे भारत स्लीपर कोच रेल्वेची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे होत असून, त्याची देखभाल दुरुस्ती मात्र १७०० किलोमीटर दूर राजस्थानमधील जोधपूर येथे केली जाणार आहे.

'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
- राजेश निस्ताने
जोधपूर- वंदे भारत स्लीपर कोच रेल्वेची निर्मिती मराठवाड्यातील लातूर येथे होत असून, त्याची देखभाल दुरुस्ती मात्र १७०० किलोमीटर दूर राजस्थानमधील जोधपूर येथे केली जाणार आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या वतीने महाराष्ट्राच्या पत्रकारांसाठी राजस्थान अभ्यास दौरा आयोजित केला. त्यात जोधपूरमधील 'भारत की कोठी' या रेल्वेच्या निर्माणाधीन देखभाल दुरुस्ती केंद्राला भेट देण्यात आली. वंदे भारत स्लीपर कोचचे पहिले देखभाल-दुरुस्ती केंद्र जोधपूर येथे तयार करण्यात येत आहे.
देखभाल, दुरुस्तीसाठी आणखी चार डेपो प्रस्तावित
देशात असे आणखी ४ डेपो प्रस्तावित आहेत. त्यात विजागअल्का आणि आंध्रप्रदेश दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईच्या वाडीबंदर डेपोचा त्यात समावेश आहे. जोधपूरच्या दुसऱ्या कामाचा टप्पा जून २०२७ ला पूर्ण होणार आहे. या प्रकल्पात रशियन कंपन्यांनी टेक्नॉलॉजी पार्टनर असल्याचे अमित स्वामी यांनी सांगितले.
पहिला स्लीपर कोचची निर्मिती जून २०२६ पर्यंत पूर्ण
वंदे भारत रेल्वे स्लीपर स्वरूपात येणार आहे. ती ५४ डब्यांची असेल. देशात केवळ लातूर येथे स्लीपर कोचची निर्मिती केली जात आहे. जोधपूर डेपोचे डिव्हिजनल मेकॅनिकल इंजिनिअर रिअर अमित स्वामी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. लातूरमधून पहिली स्लीपर कोच जून २०२६ पर्यंत बाहेर पडेल. अशा १९० स्लीपर कोच बनवून देणार आहेत. चार वर्षांत अशा २०० स्लीपर कोच वंदे भारत तयार होऊन ट्रॅकवर धावणार आहेत.
पुण्याच्या कंपनीकडे डेपो निर्मितीचा कंत्राट
वंदे भारताचा सध्या ४ दिवसांत १ हजार किमीचा प्रवास झाल्यानंतर जोधपूर येथे देखभाल दुरुस्ती बंदरखात राहणार आहे. जोधपूरचा हा अत्याधुनिक डेपो पुण्याच्या एचएटी इंजिनिअरिंग कंपनी प्रा.लि. कडून तयार केला जात आहे. या डेपोचा ६०० मीटर लांबीचा पहिला टप्पा १६७ कोटींचा असून, २०२७ ला पूर्ण होणार आहे.