‘महिला बचत गट उत्पादनांसाठी ॲप बनवा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 09:05 IST2024-08-17T09:04:32+5:302024-08-17T09:05:01+5:30
महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

‘महिला बचत गट उत्पादनांसाठी ॲप बनवा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करावे. शहरांमध्ये बचत गटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदानांवर सुटीच्या दिवशी बचत गटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू शहरांतील बाजारपेठेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली.
माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होत आहे. त्यांना मिळणारी रक्कम छोट्या व्यवसायासाठी उपयोगात आणणार असल्याचे महिलांच्या बोलण्यातून समजले. त्यामुळे आता महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.