Makar Sankranti 2018 : मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच गोष्टी चुकूनही करू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 12:12 IST2018-01-13T12:12:21+5:302018-01-13T12:12:36+5:30
14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सगळीकडे साजरी केली जाते.

Makar Sankranti 2018 : मकर संक्रांतीच्या दिवशी या पाच गोष्टी चुकूनही करू नका
मुंबई- 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सगळीकडे साजरी केली जाते. यावर्षी दोन दिवस मकर संक्रांती साजरी केली जाणारे. 14 जानेवारीला दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी सुर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर 15 जानेवारीला सकाळी 5 वाजून 11 मिनिटांपर्यंत संक्रांत असेल.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेहून उत्तर दिशेत जातो त्यानंतर खरमास सप्ताह असतो. खरमास संप्ताहात कुठलीही चांगली कामं करू नये, पण खरमास सप्ताह संपल्यानंतर शुभ कामांचा योग सुरू होतो.
शास्त्रानुसार, उत्तरायणच्या दिवसाला देवांचा दिवस व दक्षिणायनच्या दिवसाला देवांची रात्र म्हंटलं जातं. अशा प्रकारे मकर संक्रांतीला एकाप्रकारे देवतांची सकाळ मानली जाते.
संक्रांतीच्या दिवशी दानाला विषेश महत्त्व
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाची दान करणाऱ्याला परतफेड मिळतेच असं बोललं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे.
प्रत्येक राशीनुसार दान असल्याचं बोललं जातं. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने प्रत्येक राशीवर त्याचा वेगळा परिणाम होतो, म्हणून राशीनुसार दान करावं, असं तज्ज्ञ सांगतात.
ही कामं मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका
- या दिवशी पुण्यकाळात दान घासू नये तसंच केसंही धुवू नये, असं बोललं जातं.
- या दिवशी शेतात कापणी करू नये. गाय व म्हशीचं दूधही काढू नये.
- मकर संक्रांतीच्या दिवशी कुणाशीही कडवड बोलू नये. भांडणं टाळावीत.
- झाडाची तोड करू नये.
- मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार व दारूचं सेवन करू नये. खिचडीसारख्या सात्विक पदार्थांचं ग्रहण करावं.