राज्यातील प्रमुख एसटी स्थानकांचा होणार कायापालट
By Admin | Updated: January 20, 2016 02:50 IST2016-01-20T02:50:41+5:302016-01-20T02:50:41+5:30
कोंदट वातावरण आणि मोडकळीस आलेल्या इमारती यातून एसटी महामंडळाच्या प्रमुख १३ बसस्थानकांची लवकरच सुटका होणार आहे.

राज्यातील प्रमुख एसटी स्थानकांचा होणार कायापालट
पुणे : कोंदट वातावरण आणि मोडकळीस आलेल्या इमारती यातून एसटी महामंडळाच्या प्रमुख १३ बसस्थानकांची लवकरच सुटका होणार आहे. ही बसस्थानके पाडून त्या ठिकाणी नव्याने बसपोर्ट उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हे बसपोर्ट सार्वजनिक- खासगी भागीदारीतून(पीपीपी) उभारले जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये पनवेल, बोरीवली नॅन्सी कॉलनी, पुण्यातील शिवाजीनगर, सांगलीमधील माधवनगर, सोलापूरमधील पुणे नाका, कोल्हापूरमधील संभाजी नाका, नाशिक महामार्ग, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूरमधील मोरभवन या १३ बसस्थानकाचा समावेश आहे. या बसपोर्टवर सुसज्ज बसस्थानकाची रचना करण्यात येणार असून, त्यात बस टर्मिनल, बस डेपो, विश्रांती कक्ष, महामंडळाचे कार्यालय, प्रवाशांसाठी वाहनतळ, तसेच व्यावसायिकांसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)