शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे आगीचे तांडव! चेडा नगरमधील इमारतीच्या पार्किंगला आग; २९ दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 09:44 IST

Dombivli Cheda Nagar Raj Apartment Fire News: डोंबिवली पूर्वेकडील चेडा नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास आगीची एक मोठी घटना घडली. रविकिरण सोसायटीमधील राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले, यात २९ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. 

डोंबिवली पूर्वेकडील चेडा नगर परिसरात आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. रविकिरण सोसायटीमधील राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये लागलेल्या या आगीत २९ दुचाकी जळून खाक झाल्या असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने, अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

चेडा नगरमधील जय भारत स्कूलजवळ असलेल्या राज अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे ४:१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिक गाढ झोपेत असताना ही घटना घडल्याने सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, काही वेळातच आगीचा भडका उडाला आणि धुराचे लोट थेट इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचले.  धुरामुळे श्वास कोंडू लागल्याने रहिवासी घाबरून जागे झाले आणि त्यांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. तसेच आगीच्या धुरामुळे श्वसनास त्रास झालेल्या पाच नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी या आगीत पूर्णपणे जळून कोळसा झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी की अन्य काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Dombivli: Fire Engulfs Parking, 29 Two-Wheelers Gutted, Panic Ensues

Web Summary : Early morning fire in Dombivli's Cheda Nagar gutted 29 parked two-wheelers. Residents evacuated, five injured due to smoke inhalation. Firefighters controlled the blaze, preventing major casualties. The cause is under investigation by police and municipal authorities.
टॅग्स :fireआगdombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्र