शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणार; रोजगार निर्मिती, जीडीपी वाढविण्याचे प्रमुख उद्दिष्ट - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:23 IST

राणे म्हणाले की, मंत्रीपदाचा वापर देशाच्या हितासाठी करतानाच महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे.

मुंबई : सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम मंत्रालयाच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात उद्यमशील वातावरण आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल, असे या खात्याचे नवे मंत्री नारायण राणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राणे म्हणाले की, मंत्रीपदाचा वापर देशाच्या हितासाठी करतानाच महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असते ते तर करणारच; पण पंतप्रधानांनी दिलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देणे, याला माझे सर्वाधिक प्राधान्य असेल. पंतप्रधानांचा विश्वास सार्थ करायचा आहे. कोरोनाच्या महामारीने उद्योग विश्वाचे मोठे नुकसान केले आहे. उद्योगचक्र आणि त्या माध्यमातून अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. खात्याच्या कामात स्वत:ला झोकून देऊन आव्हानांचा मुकाबला करायचा आहे. दरडोई उत्पन्न आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करत सध्याच्या मंदीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाईल. अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यानिमित्ताने जबाबदारीची जाणीवही करून दिली आहे. खाते कोणतेही बरे-वाईट नसते. 

पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणारमहाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असते ते तर करणारच; पण पंतप्रधानांनी दिलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देणे, याला माझे सर्वाधिक प्राधान्य असेल.- नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMaharashtraमहाराष्ट्र