निर्मात्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Updated: March 26, 2017 02:45 IST2017-03-26T02:45:55+5:302017-03-26T02:45:55+5:30

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा शिंदे या अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी

Maid's crime against producer | निर्मात्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

निर्मात्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

वसई : ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा शिंदे या अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या या मालिकेच्या संजय कोहली या निर्मात्याविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मालिकेच्या सेटवर हा प्रकार केल्याची तक्रार तिने केली आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी येथील स्टुडिओत उभारण्यात आलेल्या सेटवर हा प्रकार घडल्याने अंगुरी भाभीने पोलिसांत तक्रार दिली.
या निर्मात्याने नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत अश्लील शेरेबाजी करून शरीरसुखाची मागणी केली होती. मालिकेतून काढून टाकले जाण्याची भीती असल्याने मी त्या वेळी तक्रार केली नाही. मात्र, आता पतीच्या सल्ल्यानंतर तक्रार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Maid's crime against producer