महेश भट्ट मूर्ख असून ते भारतीय नाहीत - अमेय खोपकर
By Admin | Updated: October 14, 2016 17:07 IST2016-10-14T16:58:10+5:302016-10-14T17:07:03+5:30
पाकिस्तानच्या कलाकारांना पाठिंबा दर्शविणारे चित्रपटनिर्माते महेश भट्ट यांना विरोध करत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी महेश भट्ट हे मूर्ख आहेत. ते भारतीयही नाहीत, असे म्हटले आहे.

महेश भट्ट मूर्ख असून ते भारतीय नाहीत - अमेय खोपकर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - पाकिस्तानच्या कलाकारांना पाठिंबा दर्शविणारे चित्रपटनिर्माते महेश भट्ट यांना विरोध करत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी महेश भट्ट हे मूर्ख आहेत. ते भारतीयही नाहीत, असे म्हटले आहे.
पाकिस्तानी कलाकार असलेले कोणतेही चित्रपट दाखविणार नाही, असा निर्णय चित्रपटगृहांच्या मालकांनी घेतल्यानंतर त्या निर्णयाचे स्वागत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले. यावेळी ते म्हणाले, आम्ही पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानच्या कलाकारांना पाठिंबा देणारे महेश भट्ट हे मूर्ख आहेत, तसेच ते भारतीय सुद्धा नाहीत.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला आहे. ‘ए दिल है मुश्किल’मध्ये फवाद खान आणि ‘रईस’ चित्रपटात माहिरा खान हे पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता.
दरम्यान, आता इम्फापाठोपाठ चित्रपटगृहांच्या मालकांनी पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट दाखविणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे. तर इतर राज्यांना या निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे.