अलिबाग : रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा माणगाव सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंगेश काळोखे यांची हत्या झाली. तपासादरम्यान थोरवे यांनी तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शुक्रवारी यासंदर्भातील पहिली सुनावणी पार पडल्याची माहिती तटकरे यांचे वकील ॲड. प्रदीप पाटील यांनी दिली.खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती शिवसैनिक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबरला हत्या झाली होती. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर थोरवे यांनी खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तटकरे यांना लक्ष्य केले होते. या संदर्भात तटकरे यांनी माणगाव सत्र न्यायालयात थोरवे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा ६५ कोटींचा दावा नुकताच दाखल केला आहे.
सर्व प्रतिवादींना बजावले समन्स माणगाव सत्र न्यायालयात शुक्रवारी यासंदर्भातील पहिली सुनावणी पार पडली, सर्व प्रतिवादींना न्यायालयाने समन्स बजावले आहेत. सुनावणीची पुढील तारीख २४ एप्रिल ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांचे वकील ॲड. प्रदीप पाटील यांनी दिली.
Web Summary : MP Sunil Tatkare filed a ₹65 crore defamation suit against MLA Mahendra Thorve in connection with allegations made after the Mangesh Kalokhe murder. The first hearing occurred; the next is April 24.
Web Summary : सांसद सुनील तटकरे ने मंगेश काळोखे हत्या के बाद लगाए गए आरोपों के संबंध में विधायक महेंद्र थोरवे पर 65 करोड़ रुपये का मानहानि का मुकदमा दायर किया। पहली सुनवाई हुई; अगली 24 अप्रैल को है।