शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:18 IST

Mahayuti vs Mahavikas Aaghadi: काँग्रेसच्या योजनांबद्दल खोटी जाहिरतबाजी करणाऱ्या भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचीही दिली माहिती

Mahayuti vs Mahavikas Aaghadi: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा क्षण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. म्हणजेच १५ दिवसांनी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. अशा वेळी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने टीका अधिक तीव्र होत चालली आहे. नुकतेच काँग्रेसने भाजपला डिवचले असून खरपूस टीका केली आहे. "महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली आहे. भाजपा सरकारचे भ्रष्टाचाराचे विक्रम पाहता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही लाज वाटेल. टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस राहिले असून २३ तारखेला हे सरकार पायउतार होईल", अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केली.

खेरा पुढे म्हणाले, "शिंदे भाजपा सरकारने पुणे रिंग रोड, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, रुग्णवाहिका खरेदी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करुन जनतेचा पैसा लुटला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराची यादी फार मोठी आहे. या सरकारने महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज प्रकल्प यासारखे तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असेलले प्रकल्प गुजरात व इतर राज्यात जाऊ दिले. यामुळे महाराष्ट्रातील १० लाख रोजगार हिरावले व राज्यातील सुशिक्षित तरुण बेरोजगारच राहिले. महाराष्ट्रात तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे, महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही शिंदे भाजपा सरकारची कामगिरी आहे."

भाजपावर टीका करताना खेरा गरजले, "भारतीय जनता पक्ष ‘बहुत झुठी पार्टी’ असून या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींपासून खालपर्यंत सर्वच जण सातत्याने खोटे बोलत असतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, एमएसपी लागू करणार अशी आश्वासने दिली. हरियाणा निवडणुकीवेळी ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते पण यातील एकही आश्वासन भाजपाने पूर्ण केले आहे. काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणीही केलेली आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात ज्या गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्याची अंमलबजवाणी सुरु आहे. युपीए सरकारने ७१ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केली होती, काँग्रेस पक्षाने हे करुन दाखवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या ५ गॅरंटी लागू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही."

काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणात दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली नाही अशा खोट्या जाहिराती भाजपाने वर्तमानपत्रातून दिल्या आहेत. काँग्रेस विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही पवन खेरा यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार