शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Mahavikas Aghadi : नगराध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीची मोट, स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:35 IST

Mahavikas Aghadi : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी नगराध्यक्ष निवडीसाठी मोट बांधली आहे. 

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी नगराध्यक्ष निवडीसाठी मोट बांधली आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे पत्रक जारी केले आहे. प्रत्येक नगरपंचायतीत आपलेच नगराध्यक्ष निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन स्थानिक नेत्यांना आणि विजयी सदस्यांना केले आहे.

राज्यात अलीकडे १०६ नगरपंचायतींसह भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद, तसेच १५ नगरपंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याचा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकात केले आहे.

तसेच नगरपंचायत निवडणुकीत मिळालेले हे यश कायम ठेवायचेआहे. त्यासाठी प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे अत्यावश्यक आहे. तरी सर्वांनी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावेत. निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आवाहन पत्रकात केले आहे. त्यामुळे निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी नगराध्यक्ष निवडीसाठी आता मोट बांधली आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस