शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महाविकास आघाडी मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी देणार?; संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:53 IST

मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं जरांगे पाटलांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जरांगेंनीही वंचितचा हा मोठेपणा आहे असं म्हणत त्यांचे आभार मानले.

मुंबई - Manoj Jarange Patil ( Marathi News ) मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळलं आहे. मराठा आरक्षणावरून जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत त्यांना इशारा दिला. त्यानंतर सरकारनेही जरांगे विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे यांचा बोलविता धनी कोण? जालनातील दगडफेक आणि बीडमधील जाळपोळ या सर्व घटनांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

वंचित बहुजन आघाडीने याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत ठेवला. १५ ओबीसी उमेदवारांना तिकीट द्यावी असंही वंचितने म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सर्वमान्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने स्वीकार करावा असं वंचितच्या नेत्यांनी सांगितले. त्याचसोबत पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना उमेदवारी द्यावी असंही वंचितने म्हटलं आहे. मात्र जरांगेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाही असं म्हणत संजय राऊतांनी ही चर्चा फेटाळली आहे. 

महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलाय, त्यात ज्या मतदारसंघात त्यांनी काम केले त्याची यादी दिली. आम्हाला लोकशाही, संविधान वाचवणे हा आमचा अजेंडा आहे. आम्ही बैठकीत सविस्तर चर्चा केली. कोण कुठे जिंकेल यावर चर्चा झाली. जिंकणे हे महत्त्वाचे आहे. जागा कोण किती लढवेल हे महत्त्वाचे नाहीत. वंचित बहुजन आघाडी हादेखील महत्त्वाचा घटकपक्ष आहे. २७ जागांचा फॉर्म्युला वंचितने दिला नाही. ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्यावर चारही पक्ष मिळून चर्चा करतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागावाटपावर बोलतोय असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, राजकारण माझा अजेंडा नाही. मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे. गृहमंत्र्यांनी कितीही संकटे उभे केले तरी ते सहज पार केले. वंचित बहुजन आघाडीचा हा मोठेपणा आहे. प्रकाश आंबेडकर हे पहिल्यापासून आंदोलनाच्या पाठिशी आहेत. माझा सध्या अजेंडा आरक्षणाचा आहे. मराठा आरक्षण मी मिळवून राहणारच आहे. माझा मालक समाज आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSanjay Rautसंजय राऊत