शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

"महाविकास आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा", नारायण राणेंनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:38 IST

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे Uddhav Thackeray यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी Narayan Rane यांनी केली आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या आत्मविश्वासाने संजय पवार यांच्या रूपात दुसरा उमेदवार दिला होता. मात्र पवार यांच्या परावभवामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, राज्यसभा निवडणूक होण्यापूर्वी काहीजण बढाया मारत होते. पण त्यांची नाचक्की झाली आहे. ते स्वत:चे आमदारही वाचवू शकले नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमुक आहोत. जी भाषा वापरायला नको होती ती वापरली. मी त्या भाषेचा उल्लेख करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. तसेच बेअब्रू झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे दुर्दैव समजतो.

राज्यसभा निवडणुकीत तीन जागा जिंकणार, असे शिवसेना सांगत होती. शेवटी काय झालं. संजय राऊत एका मताने निवडून आले. थोडक्यात वाचले आमच्या हातातून.  एकूणच सत्तेत असलेल्या आघाडीची मतं यांना मिळाली पाहिजे होती. पण तेवढी ती मिळाली नाही. उद्धव ठाकरेजी सत्ता राखण्यासाठी १४५ जणांचा पाठिंबा लागतो. तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या.नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. या महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेलंत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांचं नातंही तुम्ही धुळीला मिळवलंत. म्हणून तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

तुमचे ८-९ आमदार फुटतात. तुमच्याबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. आम्ही विरोधात असूनही आमदारांना एकत्र ठेवलं. मात्र तु्म्हाला ते जमलं नाही. शरद पवारांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली. त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, पण तुमच्याकडून तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा