शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

देशात महाराष्ट्राचा डंका, पोलीस दलास ५७ पदके; शाैर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:41 AM

राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते. 

नागपूर : शाैर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे. सोबतच आपल्या गाैरवपूर्ण कामगिरीचा झेंडाही फडकावला आहे. 

पोलिसांच्या कामगिरीचा देशपातळीवर राज्यनिहाय स्वतंत्र आणि सांघिक स्वरूपात तुलनात्मक आढावा घेऊन त्यांना विविध प्रकारची पदके प्रदान केली जातात. शाैर्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमजी), राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते. 

शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयपीएस राजा, हरिबालाजी एन. पीएसआय नागनाथ पाटील, एनपीसी महादेव मडवी, कमलेश अर्का, गिरीश ढेकाळे, नीलेश धुमणे, कॉन्स्टेबल हेमंत मडवी, अमूल जगताप, वेल्ला अत्राम, सुधाकर मोगालीवार, बिएश्वर गेडाम आणि इन्स्पेक्टर गजानन पवार. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, सुखविंदरसिंह, उपायुक्त निवृत्ती कदम आणि वरिष्ठ अधीक्षक विलास गंगावणे

राष्ट्रपती पदक यांना जाहीरचीफ फायर ऑफिसर देवेंद्र पोटफोडे, संजय पवार, उपस्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड आणि अग्निशामक राजाराम केसरी परमेश्वर नागरगोजे, अनिल खुले आणि बाळासाहेब नागरगोजे यांना जीवनरक्षक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. तर हवालदार उत्तम गावडे, संतोष मणचेकर, बदन खांडेकर या तुरुंग प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही सन्मानित केले जाईल.

राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सेवा पदकाचे ‘हे’ आहेत मानकरी...सीआयएसएफच्या आयजी मीनाक्षी शर्मा, पुण्याचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मुंबई क्राइम ब्रँचचे उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, भंडाऱ्याचे एसपी वसंत जाधव, दहशतवादविरोधी पथकाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना गाडेकर, ठाण्याच्या डेप्युटी एसपी संगीता शिंदे अल्फॉन्स

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन