शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘पुरवणी’ परीक्षेत महाराष्ट्र नापास !

By admin | Updated: March 26, 2015 00:37 IST

तांत्रिक अडचणी : इच्छाशक्तीचा अभाव, अंमलबजावणी शक्य

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही दहावी, बारावीसाठी पुरवणी परीक्षा घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने सविस्तर अभ्यास केला होता. मात्र, तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाचा अभाव, आदी कारणांमुळे पुरवणी परीक्षेचा निर्णय होऊन अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नापास झाले. अलीकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अशी परीक्षा घेणे शक्य असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांना महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षा व निकाल वेळेवर लागावे, अशी विद्यार्थी, पालकांची अपेक्षा असते. निकाल जितका लांबणीवर, तितका अधिक काळ विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतो. करिअरची दिशा ठरविण्यासाठी विचार करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. कर्नाटकात महिन्यात निकाल लागल्याने करिअरची दिशा ठरविण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे येथील मंडळाने पुरवणी परीक्षा घेण्यासाठी सविस्तर अभ्यास केला.कर्नाटकात कशा पद्धतीने नियोजन केले जाते, त्याची माहिती घेतली. मात्र, महाराष्ट्रात पुरवणी परीक्षेची यंत्रणा राबविण्यात अडचणी दिसू लागल्या. शासनाच्या शिक्षण विभागानेही विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. मंडळाने दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेऐवजी दोन विषयांत नापास असला, तरी पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची मुभा दिली. त्यामध्ये अकरावी किंवा अन्य अभ्यासक्रमांची मुख्य परीक्षा देण्यापूर्वी नापास विषय सोडविणे बंधनकारक केले. यामुळे संबंधित विद्यार्थ्यास नापास असलेल्या दोन विषयांचा आणि पुढील वर्गातील विषयांचा अभ्यास करताना ताण पडतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी याचा फारसा फायदा झाला नाही. बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबरच पर्याय राहिला.अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचे शिक्षण संस्थांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक वर्ष वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दबाव वाढविल्यास पुढील शैक्षणिक वर्षात पुरवणी परीक्षेचा निर्णय होणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर भाजप शासनाने तरी दहावी, अकरावी व बारावीसाठी पुरवणी परीक्षा घ्यावी, अशी मागणी आहे. कर्नाटकच्या धर्तीवर पुरवणी परीक्षा महाराष्ट्रात घेण्यासंबंधी मंडळाने पाच वर्षांपूर्वी अभ्यास केला होता. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रश्नपत्रिका विविध भाषेत भाषातंर करणे, परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभा करणे, अशा अडचणी समोर आल्या. त्यामुळे पुरवणी परीक्षेऐवजी दहावीत दोन विषयांत नापास असल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.- उज्ज्वला पाटील, माजी अध्यक्षा, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमहाराष्ट्रातच आठ प्रश्नपत्रिकांचे भाषांतरशिक्षक संघटनांचा वारंवार परीक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, शिक्षकांचे संप यामुळे मुख्य परीक्षा वेळेत घेऊन निकाल लावताना मंडळाची दमछाक होते. दहावीसाठी देशात फक्त महाराष्ट्रातच आठ भाषेत प्रश्नपत्रिका भाषांतर केली जाते. एकूण २७३ विषय आहेत. दीर्घोत्तरीय प्रश्न असतात. या महत्त्वाच्या अडचणी आल्याने पुरवणी परीक्षेचा विषय मागे पडला.अकरावीसाठीही पुरवणी परीक्षातेथे अकरावीच्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यास एका महिन्यात पदव्युत्तर परीक्षा मंडळ पुन्हा पुरवणी परीक्षा घेते. पास झालेल्या विद्यार्थ्यास बारावीला प्रवेश मिळतो. याउलट येथे अकरावीत नापास झाल्यास मध्ये कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. पुढील वार्षिक परीक्षेलाच पुन्हा बसावे लागते. यामुळे पूर्ण वर्ष वाया जाते. तपासणी मानधनात फरककर्नाटकात दहावीचा एक पेपर तपासण्यासाठी सात, तर बारावीसाठी दहा रुपये दिले जातात. याउलट महाराष्ट्रात दहावीसाठी सव्वाचार व बारावीचे पेपर तपासण्यासाठी पाच रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील पेपर तपासणीसाठी विलंब होण्याचे हेही एक कारण असू शकते.