शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Coronavirus: राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; आतापर्यंत ४१ जणांना बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 19:17 IST

Coronavirus आज मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये सापडला कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण

ठळक मुद्देमुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये सापडला कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्णपिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक १० रुग्णराज्यात एकाचा कोरोनामुळे मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज दोननं वाढ झालीय. पिंपरी चिंचवड आणि मुंबईत कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर जाऊन पोहोचलाय. देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १३० पेक्षा जास्त आहे. राज्यांमधल्या आकडेवारीचा विचार केल्यास कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज पिंपरी चिंचवड आणि मुंबईत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक १० रुग्ण आहेत. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे प्रत्येकी ७ रुग्ण आढळून आले आहेत. उपराजधानी नागपुरात कोरोनाचे चार जण रुग्ण आहेत. तर नवी मुंबई, कल्याण, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. मुंबईत आज एका रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याआधी त्याला हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. या रुग्णाला रक्तदाब आणि मधुमेहाचादेखील त्रास होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कोरोनामुळेच झालाय, असं म्हणता येणार नाही. याबद्दलचा अहवाल प्राप्त झाल्यावरच त्यावर भाष्य करता येईल, असं दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. मात्र संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचं सांगितलं. देशात आतापर्यंत १३८ जणांना कोरोनाची बाधा झालीय. यामध्ये महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यातल्या १२१ जणांवर उपचार सुरू असून १४ जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आलाय. देशात आतापर्यंत तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस