शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

...तर संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत; फडणवीसांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:23 IST

हिवाळी अधिवेशनात सामनावरुन शिवसेना-भाजपामध्ये रंगला 'सामना'

नागपूर: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आणि भाजपामध्ये 'सामना'वरुन चांगलाच सामना रंगल्याचं आज पाहायला मिळालं. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामनाचा अंक काढला आणि शिवसेनेनं पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका वाचून दाखवली. त्यावरुन शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी हरकत घेतली. तुम्ही तर सामना वाचत नाहीत म्हणाला होता, याची आठवण पाटील यांनी करुन दिली. त्यावर फडणवीसांनी मजेशीर प्रत्युत्तर दिलं.शिवसेना किती भूमिका बदलणार, असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचा समाचार घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातील मजकूर वाचून दाखवला. 'आज शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी त्यांच्या भाषणात बाळासाहेबांच्या आधी शरद पवारांचं नाव घेतलं. शिवसेनेनं भूमिका किती आणि कशी बदलली, हे दाखवण्यासाठी मी सामनाच सोबत आणला  आहे,' असं फडणवीस म्हणाले. यानंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील उभे राहिले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एका मुलाखतीत ते सामना वाचत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता ते सभागृहात सामना घेऊन गेले आहेत. यावर माझी हरकत आहे, असं म्हणत पाटील यांनी आक्षेप नोंदवला.गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या हरकतीला फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिलं. सामना वाचवण्यावर तुम्ही हरकत घेतली, तर संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. यानंतर फडणवीसांनी सामनामधून शरद पवारांवर करण्यात आलेली टीका वाचून दाखवली. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली. तेव्हा, शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. परंतु, ही विधानं माझी नसून 'सामना'मधली आहेत आणि गेली पाच वर्षं विरोधी पक्षनेते हेच वृत्तपत्र इथे वाचून दाखवत होते, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. तुम्ही तर सामना वाचत नव्हतात, याची आठवण काही शिवसेना आमदारांनी करून देताच, मी आता 'सामना'चं सबस्क्रिप्शन लावलंय, असं ते हसत हसत म्हणाले. अखेर, शरद पवार हे सभागृहाचे सदस्य नसल्यानं, त्यांच्याबद्दलची वाचून दाखवलेली विधानं कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारBJPभाजपा