शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session 2022: ठाकरे गटाला मोठा धक्का! तालिकाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल; एकाही सदस्यांचे नाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:14 IST

Maharashtra Winter Session 2022: विधानसभेत ठाकरे गटाऐवजी शिंदे गटातील सदस्यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Winter Session 2022: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला सातत्याने धक्के बसत आहेत. शिवसेनेतील हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी शिंदे गटात गेले. तसेच आणखी काही आमदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून गेला जात आहे. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनातही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तालिध्यक्षांच्या यादीतून ठाकरे गटाला बेदखल करण्यात आले असून, एकाही सदस्याचे नाव नसल्याचे सांगितले जात आहे. 

विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बेदखल करण्यात आले आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा तालिका सभाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. यात ठाकरे गटाच्या एकाही सदस्यांचे नाव नाही. तालिका सभाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाट, भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा आणि काँग्रेसच्या सुभाष धोटे यांच्या नावांची घोषणा नार्वेकर यांनी सभागृहात केली.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना आणि निधीला स्थगिती देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जुंपली. विधानसभेत गदारोळ झाला मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना बसण्याची विनंती केल्यानंतर वाद शमला. बजेटमध्ये मंजूर झालेली कामे होती, ही महाराष्ट्रातील कामे आहेत. ही काही कर्नाटक आणि गुजरातची कामे नाही. आम्ही अनेक सरकारे बघितली. मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार बघितले. देवेंद्रजी तुमचेही सरकार ५ वर्ष बघितले. सरकार येतात-जातात, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या सात-सात टर्म झाल्या आहेत. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामे कधी थांबली नव्हती, असा घणाघात अजित पवारांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा मांडला, पण मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही सात-सात वेळा निवडून आले असाल, आम्ही कमी निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी तुम्ही आमची सगळी कामे रोखली, माझ्या मतदारसंघातील कामे तुम्ही रोखली. अनेक वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही. ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू आणि कुणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना