शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सून दोन दिवसात महाराष्ट्र व्यापणार मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या नशिबी विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 20:33 IST

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़. 

पुणे : नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़.  येत्या दोन दिवसात मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता असून कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.  मॉन्सून शनिवारी रत्नागिरी, सोलापूर, अदिलाबाद, ब्रम्हपूरी, पेद्रा, वाराणसी, गोरखपूर या ठिकाणापर्यंत आला आहे़.  येत्या २ ते ३ दिवसात कोकणातील उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशात पोहचण्याच्या दृष्टीने अनुकुल वातावरण आहे़.  गेल्या २४ तासात काणकोण १३०, दाभोलीम १००, मार्मागोवा, संगमेश्वर, देवरुख ७०, दोडामार्ग ६०, मालवण ५०, सावंतवाडी ४०, पेरनेम, केपे २०, लांजा, राजापूर, रामेश्वरवागरी, वैभववाडी १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ मध्य महाराष्ट्रातील गडहिंग्लज ३०, बार्शी, गारगोटी, खटाव, वडुज २०, जामखेड, शिरोळ, सोलापूर, वाई १० मिमी तसेच मराठवाड्यात अंबड ६०, धारुर, जिंतूर ५०, माजलगाव, परळी वैजनाथ ४०, निलंगा, तुळजापूर, उमरी ३०, औसा, देवणी, हिमायतनगर, केज, कळंब, नायगांव, खैराव, सेलू, उमरगा २० अंबेजोगाई, मोमिनाबाद, अर्धपूर, घनसावंगी, पाथरी, रेणापूर, शिरुर अनंतपाल १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात अमरावती २०, चांदूर बाजार, पातूर, सिंधखेडराजा येथे १० मिमी पाऊस पडला़.  याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकण, मराठवाड्यात आज चांगला पाऊस झाला़. हा पाऊस अजून दोन दिवस मिळणार आहे़. २४ जूनपर्यंत संपूर्ण राज्य मॉन्सून व्यापण्याची शक्यता असून विदर्भातही २४ पासून पावसाला सुरुवात होईल़. २५ जूननंतर पाऊस कमी होण्याची शक्यता असून २६ जूनला कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़ त्यानंतर काही दिवस ब्रेक येण्याची शक्यता आहे़.  त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे़.  

इशारा : २३ जून रोजी कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ २४ व २६ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़.  

  • रविवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. 

 

  • रत्नागिरीला २४ व २६ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ व २६ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. 

 

  • पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसात मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही़. 

 

  •  पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसात मोठा पाऊस येण्याची शक्यता नाही़.  
टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसdroughtदुष्काळ