महाराष्ट्राला मिळणार 400 कोटींची मोफत वीज
By Admin | Updated: August 17, 2014 01:22 IST2014-08-17T01:22:34+5:302014-08-17T01:22:34+5:30
गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़

महाराष्ट्राला मिळणार 400 कोटींची मोफत वीज
>शिवाजी सुरवसे - सोलापूर
गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़ यामुळे येथे जलविद्युत प्रकल्प होण्यास गती मिळाली असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 400 कोटींची वीज मोफत मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितल़े वीज बचत हे राष्ट्रीय कार्य असून, विद्यार्थी हे कार्य करू शकतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला़
रायचूर-सोलापूर या 765 केव्ही पॉवरग्रीडचा तसेच पुणो-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 चा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी होम मैदानावर पार पडला़, त्या वेळी ते बोलत होत़े व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय रस्ते विकास व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार शरद बनसोडे, केंद्रीय ऊर्जा सचिव पी़ क़ेसिन्हा, आऱ पी़ सिंग आदी उपस्थित होत़े
पंतप्रधान मोदींनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात वीज, रस्ते, पाणी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भर दिला़ मोदी म्हणाले, संपत्तीमुळे रस्ते तयार होत नाहीत तर रस्त्यांमुळे संपत्ती वाढत़े तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.
भाषणात व्यत्यय
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू असताना उपस्थित प्रेक्षकांनी व्यत्यय आणला़ ‘मोदी मोदी’चा सतत नारा सुरू ठेवला. शिवाय त्यांचे भाषण सुरू असताना तुमचे भाषण नको, असे हातवारे करून सांगितले; तरीही मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण रेटल़े
शिंदेंचा विसऱ़़
या सोहळ्याचे मला निमंत्रण नव्हते, काही हरकत नाही़ या कामासाठी दूरदृष्टी असावी लागत़े देशाच्या विकासात भर घालणारा मुख्य प्रकल्प सोलापूरसाठी आणू शकलो याचा मला आनंद आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल़े गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर या मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली़
असा रंगला कलगीतुरा
मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर सोलापुरात प्रथमच आले होत़े यानिमित्ताने मोदी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला. प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण झाले. त्यांनी उद्योगधंद्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा उल्लेख करीत राज्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी कोळसा आणि गॅसची वाढीव मागणी केली. याचवेळी त्यांनी राज्यातील दुष्काळ निवारणासाठीही निधीची मागणी केली. हाच मुद्दा धरून पंतप्रधान
मोदी म्हणाले, आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना कुणाकडे काही मागत नव्हतो़ मुख्यमंत्र्यांकडे पाहात ‘मी तुमची व्यथा समजू शकतो, असे मोदी म्हणाल़े