शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जातीय गट-तट विसरल्यास महाराष्ट्र ‘पाणीदार’ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:19 IST

एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अठरा पगड जातीच्या लोकांचा समावेश होता. महाराष्ट्रात इतक्या वर्षांपासून जलसंधारणाचे प्रयत्न होत नाही, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास हा दोष समाजातील गटा तटात असणाऱ्या हेवेदाव्यात आहे. एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अमृता देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.आमीर खानच्या पाणी फाउंडेशनचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या आतापर्यंतच्या सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, एकमेकांमधील गट तट जोपर्यंत दूर होणार नाहीत तोपर्यंत जलसंधारणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. पाणीप्रश्नावर जलसंधारण हे उत्तर आहे. मात्र तो प्रश्न केवळ सरकारच्या विश्वासावर सुटणार नाही. यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. जनतेकडून वेगवेगळ्या योजना तयार झाल्यास त्यांना हातभार लावण्याचे काम सरकार करेल. पाणी फाउंडेशन यशस्वी होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यात गावातील नागरिकांचा स्वयंस्फुर्त सहभाग. सामान्यांकडून असामान्य प्रकारचे काम करुन घेण्याचे श्रेय आमीर यांना द्यायला हवे. यापुढील वॉटरकपच्या स्पर्धांमध्ये देखील सर्वपक्षीय सहभाग असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विजेत्या तीनही गावांना शासनाच्यावतीने प्रोत्साहनपर अनुक्रमे २५ लाख, १५ लाख व १० लाखांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यमंत्री विजय शिवतारे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, किरण राव, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार यांची भाषणे झाली.निवडणूकीचा काळ असला तरी स्पर्धा होऊ द्यापुढील वर्षी होणाºया सार्वत्रिक निवडणुकीचा कुठलाही परिणाम वॉटर कप स्पर्धेवर होणार नाही. पाणी हा मुख्य प्रश्न आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिले आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेले़ पिकांचा पॅटर्न निश्चित करणे आवश्यक आहे. पाण्यासाठी एकच पक्ष असून त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खान यांना केली.स्वप्न पूर्ण करण्यास मदतीचा हातसुरुवातीला शंका होती. मात्र पुढे या स्पर्धेने जलसंधारणात झालेला बदल बघून समाधान वाटले. याकरिता गरजेनुसार जेसीबी देऊन वेळेत ते काम पूर्ण करण्याकरिता मोठ्या मेहनतीने गावकºयांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करता आली. याचा आनंद वाटतो, अशी भावना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केली.पाण्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय जुगलबंदीपुणे : कार्यक्रमाला सर्वच मान्यवर आहेत तेव्हा त्यांची नावे का घ्यायची, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वाक्याने ‘पानी फाउंडेशन’च्या त्या कार्यक्रमाचे व्यासपीठ राजकीय होणार याची कल्पना उपस्थितांना आली.आता कुठे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होत असेल तर यापूर्वीचे व सध्याचे असे दोन्ही सत्ताधारी पक्षाचे नेते उपस्थित असून त्यांनी इतक्या वर्षातला इरिगेशनचा पैसा कुठे गेला? याचे उत्तर द्यावे. राज यांच्या या प्रश्नावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर ‘काही लोकं नुसते बोलघेवडे असतात. त्यांना काही करायचे नसते. केवळ सभा जिंकायची असते.’ या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांना चिमटा काढला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची फिरकी घेतली.राज म्हणाले, गावातल्या लोकांना जागृत करण्याचे काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करते? जलसंधारणामध्ये जेवढे पाणी मुरले तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. ‘पानी फाउंडेशन’मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेसे पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल.तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांनी केला असता, श्रमदानासाठी नक्की येईल. सरकारमध्ये नसल्याने मला फावडे कसं चालवायचे हे माहिती नाही, तेवढे नक्की शिकवा, असे ते म्हणाले.आमीर यांना स्वत:वर कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का मारुन घेऊ नका, असा सल्ला पवार यांनी दिला. राज्यातील काही धरणे आज १०० टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्णात अजूनही पाण्याची गरज आहे. किरण ‘राव’ करेल तेच ‘गाव’ करेल, अशी कोटीही त्यांनी केली.राजकारणाशिवाय समाजसेवा करता येतेराजकीय दिग्गजांच्या उपस्थितीबाबत आमिरखान म्हणाला, मला राजकारणात रस नाही. कुठलेही सामाजिक काम करताना सर्जनशील कल्पना, त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी, आणि सर्वांचा सहभाग गरजेचा असतो. राष्ट्रउभारणीत रस असून राजकारणाशिवाय समाजसेवा करता येते. आपण सतत सरकारकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. दुसºयांकडे बोट करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्राकडे लक्ष दिल्यास बरेच प्रश्न कमी होतील.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस