शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:26 IST

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात नवी समीकरणं दिसू शकतात, असे संकेत शिवसेना, राष्ट्रवादीनं दिले आहेत. मात्र काँग्रेस पक्ष याबद्दल फारसा अनुकूल नसल्याचं समजतं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल द्विधा मनस्थितीत आहेत. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला असला तरीही शिवसेना, भाजपाला अद्याप सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजपावर टीका करत आहेत. पुढचा मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच होईल, शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार का याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.राज्याच्या राजकारणात वेगानं घडामोडी सुरू असताना काल शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याचं समजतं.तत्पूर्वी 1995च्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचं या नेत्यानं सांगितलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, असंदेखील हा नेता पुढे म्हणाला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार