शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: आमचे आमदार फोडूनच दाखवा; राष्ट्रवादीचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:11 IST

Maharashtra Election Result 2019: महाभरतीचा संदर्भ देत भाजपावर निशाणा

मुंबई: भाजपानं आमदार फोडूनच दाखवावेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलं आव्हान दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमचे आमदार फोडून तर बघा, असं आव्हान पाटील यांनी भाजपाला दिलं.राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, शिवसेनेचे आमदारही फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. भाजपानं हा प्रयत्न करून पाहावा. आम्ही त्या ठिकाणी पुन्हा आमचा आमदार निवडून आणून दाखवू, असं पाटील म्हणाले. फोडाफोडीचं राजकारण झाल्यास राष्ट्रवादी काय करेल, हेदेखील त्यांनी सांगितलं. भाजपानं असं पाऊल उचललंच तर आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे उमेदवार देऊ. ज्या पक्षाचा आमदार फोडला जाईल, त्याच पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल आणि त्याला इतर सर्व पक्ष पाठिंबा देतील, असं म्हणत फोडाफोडीच्या राजकारणाचा मुकाबला करण्यास राष्ट्रवादी समर्थ असल्याचं म्हटलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या घाऊक पक्षांतराचा आणि महाभरतीचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी भाजपाला इशारा दिला. निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या अनेक आमदारांना, नेत्यांना भाजपानं पक्षात घेतलं. त्यांचं निवडणुकीत काय झालं, जनतेनं त्यांना कसा धडा शिकवला, हे सगळ्यांनी पाहिलंय, याची आठवण पाटील यांनी भाजपाला करून दिली. तत्पूर्वी अशाच प्रकारचा इशारा हाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिला होता. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो!', असं ट्विट त्यांनी केलं होतं. आमदारांच्या फोडोफोडीच्या शक्यतेवर भाष्य करताना सत्यजित तांबेंनी भाजपाचे नेते उदयनराजे भोसलेंच्या पराभवाचा संदर्भ दिला होता. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या उदयनराजेंनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला.   

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील