शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 09:01 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे शाब्दिक बाण; वाढणार महायुतीतला ताण?

मुंबई: विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असूनही शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश आलेलं नाही. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह सर्वच सत्तापदांची समान वाटणी व्हावी, यावर ठाम आहे. तर भाजपा मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आवश्यक आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील संवाद जवळपास संपुष्टात आला आहे. याउलट एकेमकांवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे तणाव वाढला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजपाला लक्ष्य करत आहेत. काल रात्री एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं. 'दोस्ती उन्हीं से बनाओ जो निभाने की औकात रखते हो,' असं राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा फोटोदेखील शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत 'सामना'सोबतच पत्रकार परिषदांमधून भाजपावर जोरदार टीका करत आहेत. सत्ता वाटपावरून महायुतीत संघर्ष सुरू असताना आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेचे नेते राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती राज्यपालांना देतील. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आमंत्रित करावं, अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात येईल. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यानं त्यांनी 145 आमदारांचा पाठिंबा मिळवावा आणि सरकार स्थापन करावं, असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला.राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पवार यांनी काल दूरध्वनीवरून सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात पक्षातील नेत्यांच्या मतापेक्षा शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व किंवा विश्वासार्ह मानत असल्याचं समजतं.राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अधिक आणि तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेतील. राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात देखील ते शहा यांच्याशी चर्चा करतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना