शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

महाराष्ट्र निवडणूक निकालः 'पोरखेळ नव्हे', म्हणणाऱ्या काकांचा पराभव, संदीपने विधानसभा जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:12 IST

Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यात मुसंडी मारली असून परळीनंतर बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी तर बीडमधून संदीप क्षीरसागर यांनी विजयश्री खेचून आणली.

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. संदीप क्षीरसागर हे 1786 मतांनी विजय झाला असून त्यांनी काका जयदत्त यांना पराभूत केलं आहे. संदीप क्षीरसागर यांनी शेटच्या क्षणापर्यंत काकांना टक्कर देत विजयश्री खेचून आणली. अटतटीच्या लढतीत संदीप यांनी विजय मिळवून विधानसभेची सीट काबिज केली. शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो. निवडणूक समोर ठेवून विकासाच्या चांगल्या कामात विरोधकांकडून भांडवल केले जात आहे. केवळ विरोधाला विरोध आणि व्यक्तीद्वेषातून आमच्या विरोधात राजकारण करून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले होते. तसेच, विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही, असा टोलाही जयदत्त अण्णांनी लगावला होता. मात्र, संदीप यांनीही आपण लहान पोरं राहिलं नसल्याचं दाखवून दिलंय.  

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरbeed-acबीडparli-acपरळीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार