शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 11:27 IST

Maharashtra Election Result 2019 राज्यात नवी समीकरणं दिसण्याची शक्यता

मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. विशेष म्हणजे महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत असताना आता नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. युतीच्या राजकारणात मोठ्या भावाचं स्थान गमावलेली आणि मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना नवा घरोबा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठी 1995 चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील, असं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हवाल्यानं दिलं आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. यानंतर महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात, असं राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यानं म्हटलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, असंदेखील हा नेता पुढे म्हणाला.'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'शिवसेना, भाजपानं 1995 मध्ये जो फॉर्म्युला वापरला होता, त्याच फॉर्म्युल्यानुसार आम्ही प्रस्ताव दिल्याचंदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितलं. '1995 मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, तर भाजपाकडे उपमुख्यमंत्रीपद होतं. त्याच धर्तीवर आम्ही प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होईल,' अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्यानं प्रस्ताव उलगडून सांगितला. शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवलातत्पूर्वी काल सोनिया गांधींसोबत चर्चा केल्यावर शरद पवारांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावं, असं म्हटलं होतं. भाजपा, शिवसेनेकडे बहुमत आहे. राज्यातल्या जनतेनं राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे, असं पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र तुम्ही भविष्याबद्दल बोलू शकत नाही, असं म्हणत पवारांनी काहीही घडू शकतं याचे संकेत देत सस्पेन्स वाढवला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार