शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'काय फिफ्टी-फिफ्टी लावलंय? सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 09:15 IST

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून रस्सीखेच सुरुच

मुंबई: विधानसभेच्या निकालाला नऊ दिवस होऊन गेले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा काही सुटताना दिसत नाही. नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका, चर्चा जोरात सुरू आहेत. मात्र तरीही सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलेला नाही. विशेष म्हणजे राज्यातील मतदारांनी महायुतीला अगदी स्पष्ट कौल दिलेला असतानाही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. शिवसेनेनं वारंवार 50-50 चा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेबद्दल चर्चादेखील होताना दिसत नाही. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शिवसेनेला टोला लगावला आहे. सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी करत शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं अशी आग्रही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यावरून ओवेसींनी शिवसेनेला चिमटा काढला. हे फिफ्टी-फिफ्टी काय आहे? हे काय नवं बिस्कीट आहे का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. शिवसेना, भाजपा 50-50 करणार. राज्यातल्या जनतेसाठीदेखील काहीतरी शिल्लक ठेवा. भाजपा, शिवसेनेला केवळ सत्ता स्थापनेत रस आहे. अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची त्यांना चिंता नाही. त्यांचं फक्त 50-50 सुरू आहे. हा कोणत्या प्रकारचा 'सब का साथ सब का विकास' आहे, असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला. सत्ता वाटपाच्या चर्चेतलं वजन वाढवण्यासाठी सध्या शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आणि लहान पक्षांच्या उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यावर भाष्य करताना एमआयएम शिवसेना, भाजपापैकी कोणालाच पाठिंबा देणार नाही, असं ओवेसींनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन