शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 10:16 IST

Maharashtra Election Result 2019: अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासाठी भाजपा, शिवसेनेत चढाओढ

मुंबई: सत्ता स्थापनेची चढाओढ, मुख्यमंत्रीपदासाठी दावे-प्रतिदावे सुरू असताना भाजपा आणि शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे. चंद्रपूरमधील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं पत्र जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारला मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो, असं आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. कालदेखील एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिला. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं. गेल्या आठवड्यात विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी भाजपा, शिवसेनेत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. सत्तेच्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. त्याच पार्श्वभूमीवर सत्तेच्या वाटपासाठी होणाऱ्या चर्चेत आपला दावा बळकट करण्यासाठी शिवसेना, भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षात स्पर्धा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर आमदार रवी राणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय इतर अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा, शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. सरकार स्थापनेच्या चर्चेत आपलं पारडं जड ठरावं यासाठी दोन्ही पक्षांचे नेते सध्या कामाला लागले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस