शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:57 IST

Maharashtra Election Result 2019: पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली.

मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत एक्झिट पोलचे आकडे फोल ठरवित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अनपेक्षित यश मिळविलं आहे. राज्यात सत्ता महायुतीची असली तरी महाआघाडीला प्रचंड यश मिळालं आहे.

काँग्रेसला ४३ तर राष्ट्रवादीला ५५ जागांची आघाडी मिळाली आहे. तर महायुतीत भाजपाला १०२ तर शिवसेना ६० जागांवर आघाडी आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महायुतीचं २२० पार जे सुरु होतं ते लोकांनी स्वीकारलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी पेक्षा जास्त जागा जिंकल्या, विरोधी पक्षांनी एकजुटीने काम केलं. सत्तेचा उन्माद लोकांना आवडलं नाही, प्रचारात किती टोकाची मते मांडावी याबद्दलची सीमा पार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं पवारांनी सांगितले. 

तसेच पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. साताराकरांचे विशेष आभार मानतो, साताराला जाऊन श्रीनिवास पाटील आणि तेथील जनतेचे आभार मानणार आहे. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव झाला असा टोला शरद पवारांनी उदयनराजेंना लगावला आहे. 

तर राज्यात नवीन नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न पक्षाने केला, तो आणखी व्यापक पद्धतीने करावा यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य पातळीवर जाऊन ठिकठिकाणी पक्षाचं नवीन नेतृत्व तयार करणार आहे असं शरद पवारांनी सांगत सत्ता जाते, सत्ता येते पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात असा चिमटा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना काढला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसsatara-pcसाताराSharad Pawarशरद पवारBJPभाजपा