शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 14:21 IST

Maharashtra Election Result 2019: बाळासाहेबांची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना प्रत्युत्तर

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले  आहेत. मात्र अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजपा, शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे सत्तेचा तिढा कायम आहे. सत्तापदांच्या वाटपांचा फॉर्म्युला अद्याप दोन्ही पक्षांना सापडलेला नाही. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत भाजपावर वारंवार टीका करत आहेत. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही, असा पवित्रा भाजपानं घेतला आहे. 2018 मध्येही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. भाजपा, शिवसेना सत्तेत सोबत असताना शिवसेना खासदार संजय राऊत सामनामधून वारंवार भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत होते. त्यावेळी लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात राऊत यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी युतीबद्दल विश्वास व्यक्त केला होता. शिवसेनेसोबत नक्की युती होईल, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत उत्तर दिलं होतं.शिवसेना हा पक्ष आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालतो. त्यामुळे तथाकथित सेक्युलर पक्षांचा पाडाव करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना एकत्र येणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचं दैवत आहेत. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली होती. बाळासाहेब असते तर त्यांच्या हातात सरकारचा रिमोट द्यायला आवडला असतं, असं प्रांजळपणे सांगत फडणवीस यांनी शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्नदेखील केला होता. सध्या राज्यातील स्थिती पाहता, सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची आवश्यकता आहे. मात्र शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्वच सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली आहे. याशिवाय आमच्याकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हणत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला असून  राज्यात राष्ट्रपती राजवट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे