शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: जागा कमी झाल्या, तरी स्ट्राइक रेट भारी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:15 IST

Maharashtra Election Result 2019 भाजपाची कामगिरी चांगलीच; मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई: राज्यातलं महायुतीचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. अब की बार महायुती 200 पार अशी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडीला महायुती 160 च्या आसपास जागा जिंकताना दिसत आहे. भाजपा आणि शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील, अशी परिस्थिती आहे. मात्र भाजपाची कामगिरी चांगली झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी स्ट्राइक रेटचा संदर्भ दिला. विधानसभा निवडणुकीचा स्पष्ट होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भाजपाच्या कमी झालेल्या जागांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही आकडे सांगितले. 'गेल्या निवडणुकीत आम्ही 260 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी आम्ही 122 जागांवर विजय मिळवला. आमचा स्ट्राइक रेट 46 टक्के होता. यंदा आम्ही 164 जागा लढवून जवळपास 105 जागा जिंकत आहोत. म्हणजेच आमचा स्ट्राइक रेट 70 च्या घरात गेला आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.भाजपाची कामगिरी चांगली झाल्याचा दावा करताना मुख्यमंत्र्यांनी पक्षाला झालेल्या मतदानाची टक्केवारीदेखील सांगितली. पाच वर्षांपूर्वी आम्ही 260 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी आम्हाला 28 टक्के मतं मिळाली होती. मात्र यंदा 164 जागा लढवूनही आम्हाला 26 ते 26.50 टक्के मतं मिळाली आहेत, अशी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी पराभूत झालेल्या भाजपा मंत्र्यांवरदेखील भाष्य केलं. आजचा दिवस विजयाचा आहे. उद्या पराभूत झालेल्या जागांवरील कारणांचा आढावा घेऊ. पंकजा मुंडेंचा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. त्यांच्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. मात्र तरीही निकाल विरोधात गेलाहे. त्याची कारणमिमांसा केली जाईल, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा