शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का?; भुजबळ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:19 IST

Maharashtra Election Result 2019 भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता धूसर

नाशिक: विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल. सध्या राज्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचं दिसत आहे. मात्र भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे सत्तेचा सोपान गाठण्यासाठी भाजपाला शिवसेनेची गरज लागेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत मतमोजणी आणि सध्याच्या कलांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित सरकार स्थापणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान भुजबळ यांनी केलं. याआधी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील अशाच आशयाचं ट्विट केलं आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. छगन भुजबळांनी काँग्रेसच्या प्रचाराबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसनं प्रचारात आघाडी घेतली असती तर फायदा झाला असता, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं असून आघाडीची कामगिरीदेखील चांगली झाल्याचं ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीनं पुनरागमन केलं आहे. जिल्ह्यात 6 जागा राष्ट्रवादीला मिळतील. काँग्रेसलाही 2 जागांवर यश मिळेल, असं भुजबळ म्हणाले. भाजपाच्या काही जागा आम्ही जिंकू, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे