शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 11:42 IST

रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजभवनला पोहोचणार

मुंबई: शिवसेना आणि भाजपानं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं दिसत आहे. मात्र यातूनही दोन्ही पक्षांनी दबावाचं राजकारण सुरू ठेवलं आहे. शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतले दोन्ही मोठे पक्ष राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी घेत एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईचा महापौर असल्यापासून आपण दिवाळीच्या दुसऱ्या देण्यासाठी राज्यपालांची भेट घेत असल्याचं रावते यावेळी म्हणाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीचा अजेंडा निश्चित नाही. मात्र या बैठकीत सरकार स्थापनेबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. 'मुख्यमंत्री राज्यपालांना सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती देऊन सरकार स्थापनेबद्दल चर्चा करतील,' असं या नेत्यानं सांगितलं. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या समान वाटपाची भूमिका मांडत भाजपानं याबद्दल लिखित आश्वासन द्यावं अशी मागणी केली. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं, यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवणाऱ्या भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्याचा विश्वास होता. मात्र प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 17 जागा कमी झाल्या. त्यामुळे आता सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेची आवश्यकता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा