शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलेल्या 'त्या' 7 जणांचं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 23:07 IST

Maharashtra Election Result 2019 प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मंत्रिपदाचं आश्वासन

मुंबई: यंदाच्या निवडणुकीत आमच्यासमोर विरोधकच नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री जवळपास राज्यभर फिरले. अब की बार 200 पार अशी घोषणा महायुतीकडून देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात महायुतीची गाडी 160 च्या जवळपास पोहोचली. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहा जणांचा पराभव झाला. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेल्या सातपैकी चार जणांना जनतेनं नाकारलं.मुख्यमंत्र्यांनी प्रचारादरम्यान सात जणांचा उल्लेख भावी मंत्री म्हणून केला. जनतेनं या उमेदवारांना निवडून द्यावं. मी त्यांना मंत्री करेन, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. या 7 पैकी 4 उमेदवारांचा पराभव झाला. त्यामध्ये राम शिंदे, निलय नाईक, विजय शिवतारे, बाळा भेगडेंचा समावेश आहे. भाजपाच्या राम शिंदे यांचा कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी पराभव केला. पुसदमध्ये भाजपाचे उमेदवार निलय नाईक पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांनी त्यांचा पराभव केला. भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांनादेखील पराभव पत्करावा लागला. मावळ मतदारसंघात त्यांना राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी मात दिली. तर पुरंदरमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी धक्का दिला. शिवतारेंनादेखील मंत्री करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं. फडणवीस यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलेल्या 7 पैकी 3 उमेदवारांना विजय मिळवता आला. त्यात जयकुमार गोरे, राहुल आहेर आणि राहुल कूल यांचा समावेश आहे. गोरे यांनी माण मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचा पराभव केला. तर राहुल आहेर चांदवडमधून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या शिरीषकुमार कोटवाल यांना पराभूत केलं. याशिवाय भाजपाचे राहुल कूल दौंडमधून विजयी झाले. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचं आव्हान होतं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवार