शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 05:48 IST

खुर्ची कुणासाठी ‘लाडकी’? कुणाच्या पथ्यावर पडणार वाढलेले मतदान? कोण ठरणार लाडके?

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 

२,०८७ अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कौल मागितला. २३६ विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात आहेत. एकमेकांचे जवळचे नातेवाईक एकमेकांविरुद्ध वा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये लढत असल्याचे यावेळचे चित्र आधी कधीही बघायला मिळाले नव्हते. निकालाच्या निमित्ताने घराणेशाहीचे राजकारण मतदारांनी स्वीकारले की नाकारले, हेही स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे, तर ही सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याचे तेवढेच मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. 

लाडकी बहीणसह वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा वर्षाव महायुती सरकारने केला. त्याच वेळी शेतकऱ्यांची दुरवस्था, शेतमालाचे पडलेले भाव, ‘कटेंगे तो बटेंगे’सारख्या घोषणा देऊन धार्मिक सौहार्द बिघडविल्याच्या मुद्द्यावरून मविआने महायुतीला प्रचारात लक्ष्य केले. मतदारांनी त्यापैकी कोणाला पसंती दिली, याचा फैसला निकालाने होणार आहे.

स. ८ वाजता २८८ केंद्रांवर होणार मतमोजणी सुरू

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून २८८ विधानसभा मतदारसंघातील २८८ मतदान केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ ते ८:३० वाजेपर्यंत टपाली मतपत्रिकांची तर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी ८:३० वाजता सुरू होईल. 

मतमोजणी केंद्रावर निरीक्षक, उमेदवार वा त्यांचा प्रतिनिधीसमोर सीलबंद स्ट्राँग रूम उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व प्रक्रियेवर सीसीटीव्हीची देखरेख असणार आहे. 

महाविकास आघाडी 

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशाच्या पुनरावृत्तीचा विश्वास. महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीसह अँटी इन्कम्बन्सीवर मदार.

वंचित बहुजन आघाडी 

संविधान बदलाच्या मुद्द्यासह ओबीसी, दलित आरक्षण धोक्यात असल्याचा मुद्दा घेत मतदारांचा काैल मागितला. तब्येतीवर मात करत प्रचाराची तोफ डागली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

स्वबळावर लढताना अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान. ‘राज’पुत्र जिंकणार का, याची उत्सुकता.

महायुती 

लाडकी बहीणसह वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पाऊस निवडणुकीत विजयाचे भरघोस पीक आणेल, असा विश्वास लोकसभेतील दणक्यानंतर विधानसभेत दणदणीत यशासाठी प्रचंड मेहनत.

परिवर्तन महाशक्ती वेगळी वाट धरत मुख्य प्रवाहात नसलेल्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला.

बहुमत की अपक्ष, लहान पक्षांचा टेकू?

मुंबई : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सत्तेसाठीच्या दोन तगड्या दावेदारांना शनिवारच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी काही आमदारांची गरज भासली तर अपक्ष, बंडखोर व लहान पक्षांच्या आमदारांना मोठा भाव येईल. या आमदारांना आपल्या तंबूत आणण्यासाठी जोरदार हालचाली केल्या जातील, हे स्पष्ट आहे. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी आदी नेत्यांनी मिळून स्थापन केलेली परिवर्तन महाशक्ती आघाडी यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. 

तर  महाविकास आघाडीसोबत जातील अशा पक्षांमध्ये समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांचा समावेश आहे. सर्वाधिक उमेदवार उभे करणारी बहुजन समाज पार्टी पहिल्यांदा विधानसभेत पोहोचणार का याबाबत उत्सुकता आहे. 

हे पक्ष महायुतीसोबत

राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही आमदार विजयी झाले तर ते महायुतीसोबत जातील, असे म्हटले जाते. मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. 

विनय कोरे यांच्या नेतृत्वातील जनसुराज्य शक्ती हा पक्ष भाजपसोबत जाईल. आताच ते महायुतीचा घटक पक्ष आहेत. युवा स्वाभिमानीचे रवी राणा भाजपसोबतच राहतील. 

एमआयएम तटस्थ? 

एमआयएमचे दोन आमदार गेल्यावेळी जिंकले होते. यावेळी त्यांना विधानसभेत पुन्हा स्थान मिळाले तर ते महायुतीसोबत निश्चितच जाणार नाहीत. महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा मागितला तर टीका होऊ शकते. एमआयएम तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकते. 

‘वेळप्रसंगी अपक्षांची मोट’ 

बच्चू कडू यांनी माध्यमांना सांगितले की, महायुती व मविआ दोन्हींकडून मला पाठिंब्यासाठी फोन आला आहे. एक्झिट पोल व प्रत्यक्ष निकाल यात फरक राहील. निकालानंतर भूमिका जाहीर करू. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांबाबतचे आमचे काही मुद्दे आहेत, त्यांना न्याय देणारे हवेत.

बविआची काय भूमिका?  

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा कल मविआकडे असू शकेल. विनोद तावडे प्रकरणानंतर भाजपबद्दलची कटुता निकालानंतर कायम राहील, असे मानले जाते. मात्र, त्यांच्या जवळचे काही भाजप नेते त्यांना भाजपसोबत आणू शकतात.

सारीपाटावरील मोहरे

देवेंद्र फडणवीस : भाजपला १०० पार नेण्यासाठी प्रचंड मेहनत. विविध मुद्द्यांवर मविआला घेरले. जातीय समीकरणे टोकाची असतानाही भाजप नेतृत्वाने निवडणुकीत कर्णधार केले. आता भाजपचेच कर्णधार राहणार की राज्याचे होणार याच्या फैसल्याची घडी समीप.

एकनाथ शिंदे : मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात निर्णयांचा धडाका, शेवटच्या सहा महिन्यांत निर्णयांचा वर्षाव. महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचे मोठे आव्हान. मुख्यमंत्री म्हणूनच परत येणार का? याविषयी उत्सुकता. शिवसेनेवरील वर्चस्वाबाबत उद्धव ठाकरेंना जोरदार शह देणार की नाही, याचा निर्णय आज.

अजित पवार : शरद पवार यांची धाकली पाती. काकांपासून दूर झाल्यावर लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश नाही; पण आता आपणच खरे नेते आणि आपली तीच खरी ‘राष्ट्रवादी’ हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान. निकालानंतरचे राजकीय भवितव्य काय असेल, हेही आजच ठरणार.

शरद पवार : वयाच्या ८४ व्या वर्षी आखाड्यात शड्डू ठोकून. पुतण्याच्या बंडानंतरही वर्चस्व सिद्ध करणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास आता काहीच मिनिटे बाकी. २०१९ च्या मविआ सरकारचे शिल्पकार. आता नवीन सरकार स्थापन होण्यातही तीच भूमिका करावी लागणार का? याबाबत उत्सुकता.

उद्धव ठाकरे : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही शिवसेना आपलीच हे दाखवून देण्याची निकालात संधी. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रचारात सर्वाधिक लक्ष्य केले, महाराष्ट्राच्या अस्मितेवर फोकस, मतदारांना ते किती रुचले याचा निर्णय होणार.

नाना पटोले : काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीतील यशाचा ग्राफ विधानसभेतही टिकणार का, याचा फैसला आज. १०१ जागांवर लढलेल्या काँग्रेसचा स्ट्राईक रेट मोठा राहणार की नाही आणि मुख्यमंत्रिपद चालून येणार का? याचाही फैसला आज होणार.

राज ठाकरे : परिणामांची चिंता न करता ‘मनसे’ निर्णय घेणारे नेते. सुरुवातीच्या मोठ्या यशानंतर सुरू झालेली अपयशाची मालिका खंडित करतील का? हे आज ठरणार. पुत्र अमित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे दुसरे ठाकरे. नव्या ठाकरेंचा उदय होणार की नाही, याचा फैसलाही होणार.

ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजनांची मोट बांधत महायुती अन् महाविकास आघाडीपासूनही समान अंतर ठेवत आणि ‘एकला चलो रे’ म्हणत वाटचाल करणारे नेते. दोन्हींवर सभांमधून घणाघात. विधानसभेत आपले काही शिलेदार तरी पाठविण्यात यश येणार का? हे समजणार अगदी थोड्याच वेळात.

संभाजीराजे छत्रपती : वडील काँग्रेसचे खासदार पण स्वत: राज्यात नवीन प्रयोग केला. लहान-लहान पक्षांची मोट बांधत ‘परिवर्तन महाशक्ती’ उभी केली. सहा पक्षांच्या बोलबाल्यात मतदारांनी यांना किती स्वीकारले याचे उत्तर आज मिळणार.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी