शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमध्ये ‘ती’ खेळी ठरली यशस्वी; राजेंद्र गावित यांचा ४०,३३७ मतांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 09:23 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights जिल्ह्यात वाढवण बंदर, टेक्स्टाइल प्रकल्प, उपरा उमेदवार, अशा मुद्द्यांवर गावित यांना कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. 

हितेन नाईकपालघर : पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट न देता माजी खासदार राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवल्यानंतर घडलेले नाराजीनाट्य सर्वांनी पाहिले होते; मात्र राजेंद्र गावित यांनी पूर्वी आमदार, मंत्री आणि खासदार म्हणून केलेले काम, तसेच जिल्ह्यामध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क फायदेशीर ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावित यांना मैदानात उतरवण्याची खेळी अखेर यशस्वी ठरली आहे.

पालघर विधानसभेत महायुतीकडून शिंदेसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित आणि महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्यात लढत झाली. या लढतीत गावित यांनी ४० हजार ३३७ मताधिक्याने विजय मिळवला. जिल्ह्यात वाढवण बंदर, टेक्स्टाइल प्रकल्प, उपरा उमेदवार, अशा मुद्द्यांवर गावित यांना कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. 

विजयाची कारणे  

१ राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्यात गेली काही वर्षे सतत कार्यरत असल्याने लोकांशी चांगला जनसंपर्क होता, त्याचा त्यांना लाभ झाला. २ उमेदवारीवरून झालेल्या नाट्यामुळे प्रचारात सुरुवातीच्या नाराजीनंतर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले.  ३ राजेंद्र गावितांच्या तुलनेत उद्धवसेनेचा उमेदवार जयेंद्र दुबळा हे काहीसे कमजोर ठरले. ४ विरोधकांनी वाढवण बंदर, मुरबे बंदराविरोधाचा प्रचार केला होता; मात्र पालघरच्या जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. ५ राजेंद्र गावित यांचा राजकारणातील अनेक वर्षांचा अनुभव कामी आला. 

पराभवाची कारणे 

१ पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत दाखल झाले होते. २ नागरिकांचा वाढवण बंदर, मुरबे बंदर, टेक्स्टाईल पार्क, आदींना विरोध आहे. त्याचे भांडवल केले, मात्र त्याला जनतेने फारसे महत्त्व दिले नाही. ३ लाडक्या बहिणींबाबतची सरकारची योजना महायुतीला फायदेशीर ठरली. त्याचा साहजिकच फटका उद्धवसेनेच्या उमेदवाराला बसला.४ उद्धवसेनेचे जयेंद्र दुबळा हे राजेंद्र गावितांच्या तुलनेत कसलेले नसल्याने त्याचा परिणाम झाला. ५ जनतेने उद्धवसेनेऐवजी शिंदेसेनेला पसंती दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे