शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:31 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १५ नेत्यांना एबी फॉर्म दिले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा  निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. काल भाजपाने ९९ जागांची घोषणा केली. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. पवार यांनी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडू आज सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती येथे प्रचारासाठी गाड्याही सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती, अखेर काल जागावाटप पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल भाजपाने पहिली यादी जाहीर केली, या यादीत ९९ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्या शिंदे गटाची यादी जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. 

अजित पवार यांनी या नेत्यांना दिले एबी फॉर्म

छगन भुजबळ, अतुल बेनके, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, दौलत दरोडा, राजेश पाटील, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, भरत गावित, बाबासाहेब पाटील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि वाळवा विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात भाजपातील नेत्यांना घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे बोलले जात आहे. वाळवा मतदारसंघात भाजपाच्या निशिकांत पाटील यांना तर तासगाव विधानसभेतून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना घड्याळ चिन्हावर उतरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे, बुलढाणा विधानसभेतील आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटातून बाहेर पडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला झटका बसला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनीही शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे सतीश चव्हाण (Satish chavan) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याच ठपका ठेवत आमदार चव्हाण यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला. 

आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सतीश चव्हाण हे  सध्या विधान परिषदेचे आमदार असून, गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस