शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

ठाकरे सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 11:38 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan : राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजात तारांकित प्रश्न आणि प्रश्नोत्तरं नाही हे आजवरच्या इतिहासात कधी घडलं नाही. ठाकरे सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलंय", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन LIVE UPDATES

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाच्या पत्रिकेवरुनच सरकारला धारेवर धरलं. "अधिवेशनाच्या कामकाजाची पत्रिका काल रात्री दहा वाजले तरी तयार नव्हती. आजवर हे असं कधी घडलं नाही. इतका कसला गुप्त कारभार सरकारला करायचाय?", असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी निशाणा साधला. 

MPSC वर चर्चा कराविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे