शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 23:41 IST

Maharashtra Vidhan Sabha 2024 : आज काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली.

Maharashtra Vidhan Sabha 2024 ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरुच आहे. महाविकास आघाडीमध्ये ९०,९०,९० चा फॉर्म्युला ठरल्याचे जाहीर झाला. पण अजूनही महाविकास आघाडीच्या जागावाटपात घोळ असल्याचे समोर आले आहे.आज काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत सोलापूरात दक्षिणमधून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली तर याच मतदारसंघात या आधीच ठाकरे गटानेही उमेदवार दिला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने   याआधीच अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. पाटील उद्या अर्ज दाखल करणार होते, त्याआधीच काँग्रेसने तिथे उमेदवार दिला आहे. यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण या चर्चा सुरू आहेत. यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ असल्याचे समोर आले आहे. 

आता या मतदारसंघात महाविकास आघाडीमधील कोणता पक्ष उमेदवारी मागे घेणार की मैत्रिपूर्ण लढत होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

महाविकास आघाडीमध्ये ९०-९०-९० जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. पण काँग्रेसने आता पर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ९९ उमेदवारांची घोषणा झाली आहे. 

तर दुसरीकडे, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भालके यांच्या उमेदवारी संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होत्या. आता अखेर भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024congressकाँग्रेसShiv Senaशिवसेना